*मी शिक्षणमंत्री नाही तरी मुख्याध्यापक-शिक्षकांचे प्रश्‍न लावणार मार्गी*

मी जरी शिक्षणमंत्री नसलो तरी मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्या माध्यमातून शैक्षणिक क्षेत्रातील समस्या सोडवून मुख्याध्यापक व शिक्षक यांची शाळाबाह्य कामातून मुक्तता करण्यासाठी वचनबद्ध आहे. लवकरच रत्नागिरी जिल्ह्यातील समस्या सोडविण्यासाठी शिक्षणमंत्री यांच्यासोबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्याचे आश्‍वासन रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले.रत्नागिरी जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ व माध्यमिक शिक्षण विभाग जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरूवारी शिर्के हायस्कूल रत्नागिरी येथे सभा पार पडली. जिल्ह्यातील मुख्याध्यापक यांची शासनाच्या विविध शैक्षणिक उपक्रमाच्या व गुणवत्तेच्या बाबतीत आढावा या सभेत घेण्यात आला. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत बोलत होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button