*प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड यांच्या वतीने आयोजित नेत्र तपासणी व चष्मे वाटप शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद*
*प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड जिल्हा रुग्णालय रत्नागिरी, समता फाऊंडेशन मुंबई आणि ग्रामपंचायत मालगुंड यांच्या वतीने आयोजित नेत्र तपासणी, मोफत चष्मे वाटप आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते सदर शिबिरासाठी मालगुंड परिसरातून उत्तम प्रतिसाद मिळाला एकूण 98 लोकांची तपासणी करून त्यातील 29 लोकांना मोफत चष्मे वाटप आणि 11 नागरिकांना मोतीबिंदू असल्याने त्यांची मोफत शस्त्रक्रिया होणार आहे. या शिबिरासाठी ग्रामपंचायत मालगुंड चे उपसरपंच जिल्हा रुग्णालय रत्नागिरी चे नेत्र चिकित्सक श्री. उगवेकर समता फाऊंडेशन चे श्री. शेट्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड चे आरोग्य सहाय्यक डॉ.परशुराम निवेंडकर, cho श्रीम. ठाकरे, गट प्रवर्तक श्रीम. आढाव, आरोग्य सेवक श्री किरण झगडे, आरोग्य सेविका श्रीम. हरचकर, आशा सेविका, मदतनीस तसेच ग्रामपंचायत परिचर उपस्थित होते. सदरचे शिबिराचे प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड चे वैद्यकीय अधिकारी यांचे मार्गदर्शना खाली कर्मचाऱ्यांनी उत्तम नियोजन करण्यात आले होते. या शिबिरा दरम्याने उपस्थित नागरिकांची (एनसीडी )आरोग्य तपासणी ही करण्यात आली.