*प्रशासकीय राजवटीत जिल्हा परिषदेचे काम सर्वोत्तम* – ना. सामंत*

*रत्नागिरी*:- गेल्या दोन वर्षात प्रशासक असल्याने जिल्हा परिषदेचे कामकाज अतिशय सुंदररित्या सुरू असल्याचे मत पालकमंत्री ना. उदय सामंत यांनी व्यक्त केले. मुख्य कार्यकारी अधिकारी किर्तीकरण पुजार यांच्या उत्तम कामगिरीचा पालकमंत्र्यांनी गौरव केला.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना इस्त्रो, नासामध्ये पाठविण्याचे अभियान मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांनी सुरू केले आहे. सौरऊर्जा प्रकल्प राबविला जात आहे. आज रत्नागिरी पॅटर्न संपूर्ण राज्यात राबविता येणे शक्य आहे. सामाजिक कार्यकर्त्यांना अधूनमधून अधिकार्‍यांशी कटुता घ्यावी लागते. ९९ टक्के अधिकारी, कर्मचारी चांगले काम करीत आहेत. एक टक्के कर्मचारी उर्वरितांना बदनाम करीत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. सन २०१० पासून जिल्हा परिषदेच्या प्रत्येक कार्यक्रमाला आपण आवर्जुन उपस्थित राहत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.www.konkantoday.com[17/02, 6:30 pm] shree new: राजापुरातील सोलो लावणी नृत्य स्पर्धेमध्ये इचलकरंजीतील अनुष्का भंडारीने पटकावले विजेतेपदरिक्षा सेना चालक मालक संघटना राजापूर, रिक्षा चालक मालक सौभाग्यवती संघटना राजापूरच्यावतीने आयोजित सोलो लावणी नृत्य स्पर्धेमध्ये बहारदार लावणीनृत्य करणार्‍या इचलकरंजी येथील अनुष्का भंडारी हिने विजेतेपद पटकाविले. तर सातारा येथील सृष्टी जाधव व कणकवली येथील पूर्वा मिस्त्री यांनी द्वितीय व तृतीय क्रमांक तर महाड येथील मनाली निवलेकर हिने उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले.गुरूवारी राजापूर शहरातील जवाहर चौकामध्ये झालेल्या कार्यक्रमामध्ये स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम व आकर्षक चषक देवून गौरविण्यात आले. रिक्षा सेना चालक मालक संघटनेचे अध्यक्ष संजय पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमाला खा. विनायक राऊत, आ. राजन साळवी, राजापूर तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, माजी नगराध्यक्ष ऍड. जमीर खलिफे, रिक्षा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश कदम, सुभाष गुरव, संतोष हातणकर, विजय गुरव, समीर शिंदे, सुशांत मराठे, बबली दुधवडकर, माजी नगरसेवक जितेंद्र मालपेकर, स्पर्धा परीक्षक प्रा. साळवी, वर्षा गोवळकर यांच्यासह रिक्षा चालक मालक संघटना, सौभाग्यवती महिला संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व रिक्षा व्यावसायिक आदि उपस्थित होते.www.konkantoday.com[17/02, 6:30 pm] shree new: वंचितच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी कुणबी समाजाचे नेते विशाल मोरेवंचित बहुजत आघाडी पक्षाच्या गुहागर तालुका अध्यक्षपदी विशाल शांताराम मोरे यांची निवड करण्यात आली आहे. वंचितचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांनी या निवडीची घोषणा केली. कुणबी समाजाला नेतृत्व करण्याची संधी दिल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विकास तथा अण्णा जाधव यांनी वंचितच्या गुहागर तालुका कार्यकारिणीची निवड केली असून उपाध्यक्षपदी भूषण पवार यांची तर महासचिवपदी विनोद पवार, सहसचिवपदी सुरेश मोहिते, कोषाध्यक्षपदी विजय पवार, प्रमुख संघटकपदी सुदेश कांबळे, सहसंघटकपदी अभिजित केतकर, प्रमुख सल्लागारपदी शरद जाधव, सह. सल्लागारपदी समीर पवार, मनोज पवार, प्रसिद्धीप्रमुखपदी सुगंधा मोहिते, सदस्यपदी सिद्धार्थ जाधव, संतोष पवार, अरविंद जाधव यांची निवड करण्यात आली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button