*पोलिसांचा पुन्हा एकदा* *गुटखा व्यावसायिकांना दणका*, *खेडमध्ये पावणेतीन लाखाच्या गुटख्यासह ट्रक जप्त*

____पोलिसांनी पुन्हा एकदा गुटखा व्यावसायिकांना दणका देत खेड-भरणे मार्गावरील आठवडा बाजारानजिक २ लाख ७७ हजार ४२६ रुपयांच्या गुटख्याच्या साठ्यासह १० लाख रुपये किंमतीचा आयशर ट्रक जप्त केला. या प्रकरणी अरविंद पंडित पवार (३६, मूळ गाव बांबवडे-सांगली, सध्या रा. गोवा) यास अटक केली. यामुळे गुटखा विक्रीचे गोवा कनेक्शन समोर आले आहे.दीड महिन्यापूर्वीच मुंबई-गोवा महामार्गावरील लोटे चिरणीफाटा येथे टेम्पोसह ७ लाखांचा गुटखा जप्त केला होता. गुटखा विक्री प्रकरणी एकास अटक केल्यानंतर आणखी एकाचा सहभाग असल्याचे उघड झाले होते. त्यानुसार ३ लाख रुपये किंमतीच्या अल्टो कारसह २९ हजार रुपयांचा गुटखाही जप्त केला होता.ही कारवाई ताजी असतानाच एमएच ०१०/बीआर ७४७१ क्रमांकाच्या आयशर ट्रकमधून गुटख्याची वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक नितीन भोयर यांच्या पथकाने भरणे-आठवडाबाजारनजिक सापळा रचला त्यानुसार आयशर ट्रक घटनास्थळी आल्यानंतर पथकाने थांबवून तपासणी केली. या झडतीत २ लाख ७७ हजार ४३६ रुपये किंमतीचा साठा जप्त केला.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button