दुबईतून आलेल्या इसमाला विलगीकरण सांगितल्यानंतर बेपत्ता झालेल्यावर गुन्हा दाखल


दुबईतून परतलेल्या सदतीस वर्षीय इसमास वैद्यकीय अधिकाऱयांनी विलगीकरणाचा सल्ला दिल्यानंतर तो फरारी झाल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याला पोलिसांनी पकडले असून घरात विलगीकरणासाठी ठेवले आहे हा इसम १९मार्चला दुबईहून आला त्याची आरोग्यतपासणी करण्यात आली त्यावेळी त्याला पुढील चौदा दिवस घरात राहण्याचा व सार्वजनिक ठिकाणी न जाण्याचा सल्ला देण्यात आला होता परंतु सदरचा इसम घरी न जाता दवाखान्यातून पसार झाला होता याबाबतचे गांभीर्य लक्षात घेऊन कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉक्टर संतोष हकारे यांनी याबाबत चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली त्यावर सदर इसमाविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा कलमाखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे सदर इसमाला पोलिसांनी शोधून काढले असून त्याला त्याच्याच घरात विलगीकरणासाठी ठेवण्यात आले आहे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button