
अॅट्रोसिटीचा गैरवापर झाल्यास मनसे आंदोलन करणार
मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्या विरोधात अॅट्रोसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी काही संघटना करत असून, पोलिसांनी वस्तुस्थिती तपासूनच कार्यवाही करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देणारे निवेदन खेड मनसे तर्फे शुक्रवार दि.28 रोजी पोलिसांना देण्यात आले आहे.
या निवेदनात नमूद केल्यानुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष सर्वधर्मीय व जातीय नागरिकांचे हित लक्षात घेऊन समाजामध्ये वाटचाल करीत आहे. बंधुत्व व एकोपा नांदावा यासाठी पक्षाद्वारे वेळोवेळी विशेष प्रयत्न केले आहेत. परंतु, गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव सदानंद खेडेकर यांच्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मालिकाच पोलिस प्रशासनाद्वारे सुरु केली आहे. त्यांच्या विरुद्ध अॅट्रोसिटी कायद्याचाही वापर व्हावा, अशी मागणी काही संघटनामार्फत करविली जात आहे. पोलिस प्रशासनाने वस्तुस्थिती तपासूनच कार्यवाही करणे अपेक्षित आहे. विनाकारण अशा स्वरुपाच्या अॅट्रोसिटी कायद्याचा राजकीय सुडबुद्धीने गैरवापर झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना उग्र आंदोलनाचा मार्ग अनुसरेल, असा इशारा या निवेदनात शेवटी देण्यात आला
आहे.
यावेळी मनसे तालुकाध्यक्ष दिनेश चाळके, जिल्हा सचिव संतोष नलावडे, चिपळूण तालुकाध्यक्ष अभिनव भुरण,तालुका उपाध्यक्ष संजय आखाडे, शहराध्यक्ष भूषण चिखले, पुष्पेंन दिवटे, भालचंद्र साळवी, प्रसाद शेट्ये, रहिम सहिबोले, सांस्कृतिक सेनेचे तालुकाध्यक्ष विनय माळी, महिला सेना तालुकाध्यक्ष राजश्री पाटणे, शहर उपाध्यक्षा नमिता माळी, बाबाराम पवार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित