
आपदग्रस्तांच्या मदतीसाठी सरसावले चिमुकले हात
पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या अतिवृष्टीमुळे तेथील परिस्थिती बिकट झाली असून तेथील लोकांच्या मदतीसाठी महाराष्ट्रातून मदतीचा ओघ सुरू झाला आहे.असे असताना साडवली येथील पी.एस.बने इंटरनॅशनल स्कूलच्या चिमुकल्या मुलांनी देखील पुढाकार घेतला आहे.या स्कूलच्या शाळकरी मुले ,कर्मचारी वर्ग, शिक्षक वर्ग यांनी काल देवरुख शहरातून मदत फेरी काढली. देवरूख शहरातील व्यापारी व नागरिकांना या चिमुकल्यानी व शिक्षकांनी मदतीचे आवाहन केले.त्याला चांगला प्रतिसाद मिळाला व्यापारी, डॉक्टर्स,सामाजिक संस्था,महिला बचत गट यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर मदत उपलब्ध झाली.याशिवाय बने इंटरनॅशनल स्कूलच्या शिक्षकांनी आपला एक दिवसाचा पगार आपदग्रस्तांच्या मदतीसाठी दिला.लोकांनी दिलेल्या या सहकार्याबद्दल संस्थेचे संचालक रोहन बने यांनी आभार मानले आहेत.
www.konkantoday.com