
*सर्वेक्षणाचा अहवाल सदस्यांना वाचू दिला नाही. सदस्यांकडून जबरदस्तीने सह्या घेतल्या-**राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य मेश्राम यांचा आरोप*
____राज्य मागासवर्ग आयोगाचे माजी सदस्य मेश्राम यांनी सरकार आणि आयोगाच्या अध्यक्षांवर गंभीर आरोप केले आहेत. “सर्वेक्षणाचा अहवाल सदस्यांना वाचू दिला नाही. सदस्यांकडून जबरदस्तीने सह्या घेतल्या. सर्व सदस्यांना हॉटेलमध्ये बोलवून सह्या करायला लावल्या” असा गंभीर आरोप मेश्राम यांनी केला आहे. “पुन्हा एकदा आयोगाकडून मराठा समाजाची फसवणूक झाली आहे. जो अहवाल सरकारला दिला तो सुप्रीम कोर्टात टिकणार नाही” असा दावा मेश्राम यांनी केला आहे. “कुठल्याही आयोगाने सरकारच बाहुल म्हणून काम करू नये. आयोगाने एकतर्फी काम केलं. मी नियमावर काम करत होतो म्हणून मला काढलं असावं. सर्वेक्षण नीट झालं नाही” असं मेश्राम यांनी म्हटलं आहे. ‘आयोगाचे सदस्य निष्पक्ष असावेत’ असं सुद्धा त्यांनी म्हटलय.www.konkantoday.com