
नेत्रावतीमध्ये प्रवाशाची लाखाची बांगडी चोरीला
नेत्रावती एक्स्प्रेसने प्रवास करणार्या प्रवाशांची १ लाख रुपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून चोरली असून अज्ञात चोरट्याविरूद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साक्षी ब्रीद हिने पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
साक्षी संदीप ब्रीद (५०, रा. मुंबई) या संगमेश्वर रोड रेल्वेस्टेशन फलाट क्र. १ वरील अपगाडी नं. १६३४६, नेत्रावती एल.टीटी एक्स्प्रेसचे बोगी नं. एम/१ मध्ये चढत असताना स्वस्तिक डिझाइन असलेली १ सोन्याची बांगडी चोरट्याने गर्दीचा फायदा घेवून चोरून नेली. याबाबत पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्याविरूद्ध भादंवि कलम ३७९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. www.konkantoday.com