*रेशन संपले असे पत्नीने सांगताच पतीला आला राग व केली पत्नीला बेदम मारहाण*

____मंडणगड तालुक्यातील पंदेरी-कोंडगाव येथे घरातील रेशन संपले असे सांगितल्याच्या रागातून पतीने पत्न्ाीला बेदम मारहाण केली. ही घटना गुरुवार 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 11.30 वा. घडली.महमद उमर चिमावकर (रा.पंदेरी कोंडगाव मंडणगड, रत्नागिरी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयित पतीचे नाव आहे. त्याच्या विरोधात पत्नी कैसरी महमद चिमावकर यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, महमद चिमावकर हा कोणताही कामधंदा करत नसल्याने गुरुवारी कैसरी हिने त्याला घरातील रेशन संपले असल्याचे सांगितले. यावरुन त्यांच्यात वाद सुरु झाला. या रागातून महमदने घरासमोरील पडवीतील भिंतीवर पत्नी कैसरीचे डोके आपटले. त्यानंतर तिच्या नाकावर स्वतःचे डोेके मारुले त्यामुळे तिच्या नाकातून रक्तस्त्राव झाला. तसेच पाठीवर हातांच्या ठोशांनी व बुक्क्यांनीही जबर मारहाण केली. याप्रकरणी अहमद चिमावकर विरोधात भादंवि कायदा कलम 324, 323, 504, 506 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button