*भिंत कोसळल्याने रस्ता बनला धोकादायक*,*प्रशासनाचे दुर्लक्ष; विनोद पवार यांचा उपोषणाचा इशारा*
____संगमेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत श्रृंगारपूर, कार्यक्षेत्रातील नायरी, शृंगारपूर, कातुर्डी रस्त्याजवळील संरक्षण भिंत पडल्यामुळे येथील रस्ता खराब झाला असून, प्रवास धोकादायक बनला आहे.याचा विचार करून येथील काम तत्काळ व्हावे यासाठी शृंगारपूर ग्रामपंचायतचे सरपंच विनोद पवार यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता; मात्र त्याला यश न आल्याने अखेर त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.तालुक्यातील शृंगारपूर कातुर्डी येथील एजिमा ६७ या रस्त्याची २०२० ते २१ ला आलेल्या अतिवृष्टीमध्ये कीलोमीटर ०/१०० मध्ये नायरी श्रृंगारपूर फाट्याजवळ रस्त्यालगतची संरक्षक भिंत कोसळून बाजूला असलेल्या नदीत वाहून गेली. यामुळे रस्ता ही पूर्णतः खराब झाला. त्याबाबत संबंधित विभागाकडे माहिती देण्यात आली. ही संरक्षण भिंत वाहून गेल्यामुळे येथील रस्तादेखील प्रवासाकरिता जीवघेणा व धोकादायक बनला आहे. या समस्यांचा विचार करून शृंगारपूर ग्रामपंचायतचे सरपंच विनोद पवार यांनी ही संरक्षण भिंत व्हावी व रस्तादेखील व्हावा याकरिता सातत्याने पाठपुरावा केला होताwww.konkantoday.com