*दगडफेकप्रकरणी ठाकरे गट आणि भाजपच्या तब्बल 300 ते 400 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल*

__चिपळूण येथील दगडफेकप्रकरणी ठाकरे गट आणि भाजपच्या तब्बल 300 ते 400 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. चिपळूण शहर पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला.गुहागर येथील सभेसाठी माजी खासदार नीलेश राणे यांच्या गाड्यांचा ताफा जात असताना चिपळूण येथे मोठा गोंधळ निर्माण झाला होता. या वेळी गाड्यांवर दगडफेक करण्यात आली होती. आमदार भास्कर जाधव आणि नीलेश राणे यांचे कार्यकर्ते आमने-सामने आले होते. त्यामुळे चिपळूण शहरात शुक्रवारी मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर अखेर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांड्यांचा वापर करावा लागला होता. शुक्रवारी रात्री अखेर शिवसेना ठाकरे गट आणि भाजपच्या जवळपास 300 ते 400 कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button