*तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा.. पण त्याआधी सर्व फुटेज तपासा,- शिवसेना आमदार भास्कर जाधव*

*______पोलिसांनी गुन्हे दाखल करण्यापूर्वी फुटेज चेक करावे. घटनाक्रम तपासावेत. आम्ही पोलिासांना असं काही घडणार असल्याची सांगितलं होतं. माझ्या कार्यालयाबाहेर गोंधळ करायचा हे आधीच त्यांनी ठरवलं होतं.आधीच चिथावणीखोर टीझर प्रसारित केला होता. दोन मार्ग असतानाही निलेश राणे माझ्या कार्यालयाबाहेरुन गेले, असे आमदार भास्कर जाधव म्हणाले. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. माझ्या कार्यलयासमोर पोस्टर, बॅनर लावले. रत्नागिरीच्या परंपरेप्रमाणे आम्ही तुमच्या पोस्टरला हात लावला नाही. मग हा प्रकार कसा घडला. सभा गुहागरला होती. निलेश राणे मुंबईवरुन आले. वास्तविक गुहागरला जाण्यासाठी दापोली मधून जाता आले असते पण ते चिपळूण मधून आले काही हरकत नाही. माझ्या कार्लायलच्या बाजूला असणाऱ्या रस्त्यावरुन गाड्या गेल्या. सभेआधी टीझर वैगरे टाकून वातावरण निर्मिती केली होती. दंगल घडावी असं वातावरण निर्मिती केली होती. त्यामुळे माझ्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात समर्थक जमले होते. त्यावेळी तुमची कुणी छेड काढला का? नाही काढली. नाही काढली. माझ्या कार्यलयाच्या जवळून गाड्या गेल्या… त्यावेळीही कुणी विरोध केला नाही. विराध करायचा असता तर तिथेच केला असता. मीही त्यावेळी तिथं होतं. पण कुणी विरोध नाही केला. मग नंतर काय घडलं की पोलिस 300 लोकांवर गुन्हे दाखल करत आहेत, असे भास्कर जाधव म्हणाले. माझ्या घरासमोर स्वागत करा. मला काही प्रॉब्लेम नाही.रितसर सभा करावी मला काहीच हरकत नाही. पण त्यांच्याकडून निरोप आले. मला काही मेसेज मिळाले.. आम्ही भास्कर जाधव यांच्या कार्यालयाबाहेर आम्ही धिंगाणा करणार, राडा करणार, दगडफेक करणार… हे चालणार नाही, असे मी पोलिसांना सांगितलं. ते चालू न देण्याची जबाबदारी माझी नाही, पोलिसांची आहे. त्यासाठी आम्ही पोलिसांना अधिकृत पत्र दिलं होतं. पण पोलीस असतानाही माझ्या कार्यालयाबाहेर दीड तास राडा सुरु होता. त्यांनी नंतर पायी मिरवणूक काढायला सुरुवात केली. माझ्या कार्यालयापासून 60 किमी सभा लांब असतानाही ते पायी निघाले होते. पण पोलिसांनी त्यांना रस्ता रोखून धरायची परवानगी दिली कशी. पोलिसांनी आमच्या बाजूला मज्जाव केला. आमच्या बाजूला बॅरेकेट्स लावले अन् त्यांना रिकामं सोडलं. तुम्ही सगळं पाहू शकता. ते आमच्याकडे चालून आले.. आमचा एकही माणूस पलीकडे गेला नाही. तुम्ही कितीही गुन्हे दाखल करा.. पण त्याआधी सर्व फुटेज तपासा, असे भास्कर जाधव म्हणाले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button