
*टायगर इज कमिंग असे म्हटले जात होते, परंतू टायगर मैदान सोडून आधीच पळून गेला-ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांचा टोला*
_____टायगर इज कमिंग असे म्हटले जात होते. परंतू टायगर मैदान सोडून आधीच पळून गेला, लोकसभेला निवडणुकीतून देखील त्यांनी पळ काढलाच आहे, असा टोला शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सचिन कदम यांनी शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत लगावला. तसेच अंत्यत खालच्या पातळवर जाऊन वक्तव्य करणाऱ्या माजी खासदार निलेश राणे यांच्यावर पोलिसांनी कारवाईची मागणीही त्यांनी केली आहे. भाजपमध्ये बाहेरून आलेले दत्तकपुत्रच पक्ष चालवत आहेत. एक दिवस हेच दत्तकपुत्र भाजपला बुडवतील. भाजपची त्या दृष्टीने वाटचाल सुरू असून राणे यांच्या कृतीतून ते प्रकर्षाने जाणवले.माजी खासदार निलेश राणे व आमदार भास्कर जाधव यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यावरून शिवसेना उद्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाने पत्रकार परिषद घेऊन निलेश राणेंच्या व्यक्तव्याचा निषेध केला. जिल्हाप्रमुख सचिन कदम म्हणाले, टायगर इज कमिंग ची केलेली बॅनरबाजी ही राड्याचे द्योतक होते. आमदार जाधवांन उत्तर देण्यासाठी अथवा राडा करण्यासाठी सभा घेतली, हे यातून स्पष्ट झाले आहे.www.konkantoday.com