
*जे स्वतःला जिल्हा काँग्रेसचे नेते समजतात त्यांच्यामुळेच आज रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट-**काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष ॲड सदानंद गांगण*_
___जे स्वतःला जिल्हा काँग्रेसचे नेते समजतात त्यांच्यामुळेच आज रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची अवस्था बिकट झाली आहे, अशा शब्दात रत्नागिरी जिल्हा काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष आणि जेष्ठ पदाधिकारी ॲड सदानंद गांगण यांनी जिल्हा काँग्रेसला घरचा आहेर दिला आहे.पत्रकारांशी बोलताना ॲड सदानंद गांगण हे म्हणाले की, आज रत्नागिरी जिल्ह्यात काँग्रेसची अवस्था अतिशय बिकट आहे .याला कारण हे जिल्ह्याचे स्वतःला नेते समजणारे आहेत. त्यांच्यामुळेच ही अवस्था झाली आहे. आजवर ज्यांनी मंत्रीपदे भोगली, आमदारकी खासदारकी भोगली परंतु सर्वसामान्य जनतेकडे त्यांनी कधीही लक्ष दिले नाही. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याकडे लक्ष दिले नाही. कधी पक्षाचा मेळावा घेतला नाही तर कधी काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे काय आहेत, त्यांच्या अडचणी काय आहेत हे समजून घेतले नाही. आणि म्हणूनच आज ही अवस्था काँग्रेसची इतकी बिकट अवस्था झाली आहे.मुंबईत बसून पक्षाचे काम करता येत नाही असा देखील टोला सदानंद गांगण यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना लगावला आहेwww.konkantoday.com