*खेड येथे हॉटेल गणपती कृपा समोर ट्रक आणि दुचाकी मध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार*

^मुंबई गोवा महामार्गावर वेरळ या ठिकाणी हॉटेल गणपती कृपा समोर ट्रक आणि दुचाकी मध्ये झालेल्या भीषण अपघातामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात जागीच ठार झालेला तरुणाचे नाव आतिफ सोलकर असे असून तो रत्नागिरी येथील उद्यमनगर येथे राहणारा आहे. हा अपघात 2.45 च्या सुमारास झाला यातील ट्रक हा गोव्याहून मुंबईच्या दिशेने जात होता तर दुचाकी ही खेडहून रत्नागिरीच्या दिशेने येत होती. हॉटेल गणपती कृपा च्या समोर असणार्‍या डायव्हर्शनमुळे ट्रक आणि दुचाकी चा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला दुचाकी ट्रकच्या खाली अडकून 20 ते 25 फूट त्या ट्रकने दुचाकीला अक्षरशः फरपटत नेले होते.हा अपघात झाल्यानंतर वेरळ येथील स्थानिक ग्रामस्थांनी त्या ठिकाणी धाव घेतली, या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीवर देखील काही प्रमाणात परिणाम झाला होता. महामार्गावरील अर्धवट कामामुळे वारंवार अपघात होत असून त्यामध्ये निष्पाप लोकांचे बळी जात आहेतwww.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button