
कशेडी टॅप पोलीस हद्दीत गतवर्षात 34 अपघातात 16 ठार
राज्यातील विविध महामार्ग मार्गसह इतर रस्त्यांवर अपघातांचे सत्र सातत्याने सुरू असून जनजागृती नंतरही अपघाताचे प्रमाण चिंताजनक बनले आहे. गेल्या दोन वर्षांचा आलेख लक्षात घेता 2023 मध्ये 32 अपघात मध्ये 32 जणांचा मृत्यू झाला होता तर 2024 मध्ये 2 अपघात जास्त झाले आहेत.मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी टॅब हद्दीतब 2024 या वर्षातील जानेवारी ते डिसेंबर मध्ये एकूण अपघात 34 झाले आहेत. या अपघात 16 जणांना जीव गमवावा लागला आहे. तर 12 हजार 302 वाहनचालकांना विरोधात कारवाई करत दंडात्मक कारवाई पोटी 1 कोटी 52 लाख 82 हजार 300 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे मुंबई- गोवा महामार्ग कोकणसाठी महत्त्वाचा आहे. महामार्ग वरील वाहनांची तपासणी अपघात प्रसंगी तातडीची यंत्रणा राबविण्यासाठी पलस्पे फाटा ते तळ कोकण पर्यत 7 ठिकाणी महामार्ग पोलीस यंत्रणा उभारण्यात आली आहे या पैकी रायगड जिल्हा व रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमेवर कशेडी महामार्ग पोलीस यंत्रणा उभी करण्यात आली असून या विभागाने आपल्या अधिपत्याखाली असलेल्या मार्गावर केलेल्या वाहनवरील कारवाई पोटी कोट्यावधी रुपयांचा दंड वसूल केला आहे