*वेंगुर्ले वखारिला पुन्हा गत वैभव प्राप्त होणार*

शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या व स्वराज्याच्या जडण घडणीत महत्त्वाचा वाटा उचललेल्या वेंगुर्ले कोट उर्फ किल्ले डच वखारिला पुन्हा गत वैभव प्राप्त होणार आहे.दिवसेंदिवस या वास्तूची वाढती दुरावस्था लक्षात घेता जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून सातत्याने गेली दहा ते बारा वर्षे पुरातत्व विभागाच्या परवानगीने स्वच्छता मोहिमा राबविल्या. तसेच दुरुस्तीबाबत सातत्याने पाठपुरावा केला. अखेर पुरातत्व विभागामार्फत या डच वखारीच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ केला आहे. त्यामुळे या ऐतिहासिक वास्तूतील जुन्या आठवणींना आता उजाळा मिळणार आहे. असे जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजीव लिंगवत यांनी सांगितले.या डच वखार मधील प्रथम साफसफाई चे काम करून आता डागडुजी कामास कामगारांनी सुरुवात केली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button