
*विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे यांनी घेतला जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांचा घेतला आढावा*
_कोंकण परीक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय दराडे (भा.पो.से.) यांनी पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस मुख्यालय व जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांना दिनांक 14/02/2024 व 15/02/2024 रोजी भेटी दिल्या व या भेटी दरम्यान पोलीस ठाण्यांमधील 1) सर्व अभिलेख, 2) सर्व प्रकारचे रजिस्टर, 3) मुद्देमाल, 4) शस्त्रागार, 5) प्रलंबित अर्ज, यांचा आढावा घेतला तसेच 6) पोलीस अंमलदार यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी दरबार भरविण्यात आला व उपस्थित पोलीस अधिकारी व अंमलदार यांना कायदा व सुव्यवस्था, आगामी निवडणूक, पोलीस खात्याची शिस्त व गुन्हे प्रतिबंध या बाबत मार्गदर्शन केले.विशेष पोलीस महानिरीक्षक, कोंकण परिक्षेत्र श्री. संजय दराडे (भा.पो.से.) यांनी आपल्या दौऱ्या दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय येथे भेट दिली व उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांच्या कामाचा आढावा घेतला तसेच या भेटी दरम्यान पोलीस अधीक्षक कार्यालय येथे ‘कोकण रेल्वेची सुरक्षा व उपाययोजना’ या विषयावर बैठक घेतली.या बैठकी करिता श्री. अंजनीकुमार सिन्हा, आय.जी रेल्वे, श्री. फ्रान्सिस लोबो, प्रादेशिक सुरक्षा आयुक्त आर.पी.एफ, मडगाव, श्री. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक रायगड, श्री. सौरभ अग्रवाल, पोलीस अधीक्षक सिंधुदुर्ग, श्रीमती. जयश्री गायकवाड अपर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, श्री. अशोक धोत्रे ए.एस.सी-आर.पी.एफ, रत्नागिरी, रेल्वे पोलीस निरीक्षक रत्नागिरी श्री. मधाळे, रेल्वे पोलीस निरीक्षक श्री. संतोष बर्वे, आरपीएफ चिपळूण, श्री. पाटील, स्थापत्य अभियंता (ट्रॅक मेंटेनन्स- रोहा-मदुराई), श्री. राजेश जोशी इलेक्ट्रिकल विभाग, रत्नागिरी, श्री. सचिन देसाई, पी.आर.ओ कोंकण रेल्वे रत्नागिरी असे उपस्थित होते व या बैठकी दरम्यान रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथून जाणाऱ्या कोंकण रेल्वे च्या सर्व पोलीस स्टेशनचे प्रभारी हे देखील व्ही.सी च्या माध्यमातून उपस्थित होते.या बैठकी दरम्यान कोंकण रेल्वे च्या विविध मुद्द्यावर चर्चा करण्यात आली जसे-1) आरपीएफ आणि पोलीसांची भूमिका व समन्वय,2) मानवनिर्मित आपत्ती ओळखणे,3) रेल्वे मालमत्तेचे नुकसान रोखणे,4) रेल्वे गुन्ह्यांना प्रतिबंध करणे,5) रेल्वे क्रॉसिंग वर योग्य नजर ठेवणे,6) योग्य बळाचा वापर करून पेट्रोलिंग करणे,7) संयुक्त मॉक ड्रिल आयोजित करणे इत्यादितसेच भविष्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये या करिता उपाय योजनांवर देखील चर्चा करण्यात आली.या बैठकी दरम्याने श्री. अंजनीकुमार सिन्हा, आय.जी रेल्वे यांनी देखील उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व रेल्वे अधिकारी यांना रेल्वे सुरक्षा संदर्भात मार्गदर्शन केले.www.konkantoday.com