*राज्यात श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने, ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ साजरा करण्यात येणार*
___मराठी साम्राज्याचा इतिहास आणि आपली संस्कृती राज्यातील 400 पेक्षा जास्त असलेल्या गड-किल्ल्यांच्या अवतीभोवतीच आहे. आपला समृद्ध इतिहास आणि संस्कृतीचे जतन आणि संवर्धन व्हावे यासाठी दि.१९ फेब्रुवारी रोजी श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने, ‘हिंदवी स्वराज्य महोत्सव’ साजरा करत आहोत. तीन दिवस विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांनी दिली.गिरीश महाजन म्हणाले, राज्यात असलेले गिरीदुर्ग, भूदुर्ग, जलदुर्ग यांच्या जतन आणि संवर्धनासाठी केंद्र शासन व राज्य शासनाचे वेगवेगळे कायदे आहेत. केंद्र व राज्य शासनाकडे नोंद असलेल्या आणि खासगी मालक असलेली ठिकाणे वगळून किल्ल्यांच्या संवर्धनाबरोबर नोंद न झालेल्या किल्ल्यांचा विकास होणे गरजेचे आहे. राज्यातील किल्ल्यांच्या विकासकामांना शासन प्राधान्य देत आहे.गड -किल्ले पर्यटनाला चालना देण्यासाठी किल्ल्याच्या पायथ्यालगत पर्यटकांसाठी कॅराव्हॅन कॅम्पिंग, टेन्ट कॅम्पिंग, व्हर्च्युअल रियालिटी च्या माध्यमातून पर्यटकांना गडकिल्ल्यांचा इतिहास सांगता येईल. शिल्प स्वरूपात इतिहास प्रदर्शन उभारणे ही कामे केली जात आहेत. किल्ले पर्यटन धोरण अंतर्गत ही विविध कामेही करण्यात येत आहेत.जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये अकरा गड – किल्ले आहे. तर जगभरातील पर्यटक आपल्या देशात येऊन पर्यटनात वाढ होईल. पर्यटनासाठी जिल्हा वार्षिक योजना, सीएसआर आणि प्रादेशिक पर्यटन योजनांच्या माध्यमातून गड किल्ले विकासाला चालना देण्यातयेत असल्याची माहिती महाजन यांनी दिली.www.konkantoday.com