*रत्नागिरी शहरातील झाडगाव येथे तरुणाची अज्ञात कारणातून आत्महत्या*
___रत्नागिरी शहरातील झाडगाव येथे तरुणाने अज्ञात कारणातून घराच्या मागील बाजूस असलेल्या खोलित गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी उघडकीस आली.स्वप्निल दिपक गावडे (38,रा.झाडगाव,रत्नागिरी) असे गळफास घेत आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत त्याचा भाउ ओंकार गावडे याने शहर पोलिसांना खबर दिली. त्यानुसार, बुधवार 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वा. स्वप्निल घरातून काही कामानिमित्त बाहेर निघून गेला होता. असा एक-दोन दिवस कामानिमित्त घराबाहेर नेहमी जात असल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याचा कुठेही शोध घेतला नाही. गुरुवारी सकाळी त्याचा भाउ काही घरामागील नेहमी बंद असलेल्या खोलित काही कामानिमित्त गेला असता तेथील वाश्याला स्वप्निल नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला. www.konkantoday.com