*पाेलिस महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतरपाेलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी आपण काम केलेल्या घरडा कंपनीला अचानक भेट देऊन सहकाऱ्यांशी संवाद साधला*
_____काेकण परिक्षेत्राचे विशेष पाेलिस महानिरीक्षक संजय दराडे यांनी आठ दिवसांपूर्वी पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर ते बुधवारी रत्नागिरी जिल्हा दाैऱ्यावर आले हाेते. या दाैऱ्यात त्यांनी घरडा केमिकल कंपनीला भेट देऊन तेथील सुरक्षिततेबाबत पाहणी केली. यावेळी त्यांच्यासाेबत अतिरिक्त पाेलिस अधीक्षक जयश्री गायकवाड आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित हाेते.दराडे यांनी केमिकल इंजिनिअरिंग केले असून, २०२१-२०२२ या कालावधीत घरडा कंपनीत मेटनन्स इंजिनिअर म्हणून काम केले हाेते. एक वर्ष काम केल्यानंतर त्यांनी नाेकरी साेडली आणि केंद्रीय लाेकसेवा आयाेगाची परीक्षा देऊन ते पाेलिस दलात सामील झाले. आता पाेलिस महानिरीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आपण काम केलेल्या घरडा कंपनीला त्यांनी अचानक भेट देऊन सहकाऱ्यांशी संवाद साधला. या भेटीत त्यांच्यासह त्यांचे जुने सहकाऱ्यांनाही गहिवरून आले.संजय दराडे यांनी सांगितले की, महाड येथील दुर्घटनेची पुनरावृत्ती हाेऊ नये म्हणून ही भेट हाेती. माझ्या वाटचालीत माझ्या सहकाऱ्यांचाही सहभाग आहे. त्यामुळे त्यांना भेटून आनंद झाला. मी प्रशिक्षक म्हणून हाेताे पण सहकाऱ्यांनी खूप काही शिकविले. असे ते म्हणाले.www.konkantoday.com