*टायगर इज कम बॅक’ ‘चुकीला माफी नाही’! ‘हिशोब चुकता करणारच’, निलेश राणे यांच्या सभेच्या पार्श्वभूमीवर बॅनर झळकले*
____भारतीय जनता पार्टीचे नेते निलेश राणे यांची शुक्रवारी संध्याकाळी ५ वाजता होत असून या पार्श्वभूमीवर चिपळूणात ‘टायगर इज कम बॅक’ ‘चुकीला माफी नाही’! ‘हिशोब चुकता करणारच’ अशा आशयाचे बॅनर झळकले आहेत. यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.काही दिवसांपूर्वी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत सिंधुदुर्गात जनसंवाद सभा झाल्या. यावेळी आ. भास्कर जाधव यांनी राणे कुटुंबीयांवर टीका केली. यानंतर भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन या टीकेला गुहागरात येऊन जोरदारपणे प्रत्युत्तर देण्याची घोषणा केली.या पार्श्वभूमीवर गुहागर भाजपचे तालुकाध्यक्ष निलेश सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी सकाळी गुहागर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी या सभेला सज्ज राहण्यास सांगण्यात आले असून पदाधिकारी देखील मोठ्या उत्साहात जोरदार कामाला लागले आहेत.तसेच गुहागरात सभेचे बॅनर लागले असून सभेस्थळी देखील जोरदार तयारी सुरू आहे. याचबरोबर चिपळूणमध्ये देखील बॅनर झळकले आहेत. या बॅनरच्या आशयाने ही सभा नक्कीच वादळी होण्याची शक्यता आहे. www.konkantoday.com