
*खासदार संजय राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे हे मोठे घटनातज्ज्ञ आहेत त्यांच्या टिप्पणीवर मी उत्तर देण्या इतपत मोठा नाही-विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर*
__राष्ट्रवादी आमदार प्रकरणाच्या निकाल दिल्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली. तर खासदार संजय राऊत, आमदार जितेंद्र आव्हाड आणि आदित्य ठाकरे हे मोठे घटनातज्ज्ञ आहेत त्यांच्या टिप्पणीवर मी उत्तर देण्या इतपत मोठा नसल्याचे म्हणत अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी तिघांना खोचक टोला लगावला आहे.राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालानंतर माध्यमांशी बोलताना विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले की, माझ्यासमोर राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणाच्या याचिका होत्या. त्याचा निकाल आज दिला. सर्वोच्च न्य्यालयाने घालून दिलेल्या गाइड लाइन्सच्या आधारे हा निकाल दिला आहे. कायद्याला धरुन हा निकाल दिला आहे. दिलेला निकाल हा स्पष्ट शब्दांत असून, निकाल देताना कुठल्याच असंवैधानिक पद्धतीचा वापर केला नसल्याचेही नार्वेकर यावेळी म्हणाले.खासदार संजय, आमदार आदित्य ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड अशा कायदेतज्ज्ञ आणि महान व्यक्तींच्या टिप्पणीवर मी कुठलीच प्रतिक्रिया देणार नाही. ज्या लोकाना दहाव्या शेड्यूल्डबाबत माहिती नाही त्यांनी यावर बोलू नये, जितेंद्र आव्हाड, आदित्य ठाकरे आणि संजय राऊत हे राज्यघटनेचे मोठे अभ्यासक आहेत त्यांच्या टिप्पणीवर मी काहीच बोलणार नाही. मी दिलेला निकाल संसदीय लोकशाहीला मजबूत करणारा असणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यावेळी म्हणाले.www.konkantoday.com