
*कवितके कुटुंबाचा जा कार्यक्रम वाघ्या मुरळीना मान सन्मान देणारा*
___जागरण गोंधळ कार्यक्रम मधील देवदासी ( मुरळी) म्हटलं की समाजाचा त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टीकोन हा कसा असतो हे आपणा सर्वांना माहीत आहे. परंतु याच देवदासीमुळे आपल्या सर्वच शुभकार्यातील घेण्यात येणाऱ्या जागरणाने आपल्या रूढी धार्मिक परंपरा इत्यादी कार्यक्रम पूर्ण होतात,परंतु हे कार्यक्रम करत असताना देवदासी – मुरळी विषयी आपल्या समाजामध्ये सन्मान व आदराची भावना तयार व्हावी असा एक कार्यक्रम रत्नागिरी समुद्र किनार्यालगत असलेल्या रत्नदुर्ग किल्ल्यावरील मंदिरामध्ये घेण्यात आला होता. हा रत्नागिरी व पुसेगाव येथील कवितके कुटुंबाने एकत्रितरित्या घेतलेला जागरण चां कार्यक्रम खरोखरच देवदासी -वाघ्या मुरळीना ,यांना मानसन्मान देणारा व संपुर्ण समाजाला प्रेरणादायी ठरणारा असा आहेरत्नागिरी शहरातील कवितके कुटुंबीय हे मूळचे महिमानगड ,तालुका माण जिल्हा सातारा येथील आहेत.पूर्वी महिमानगड ही माण तालुक्यातील एकेकाळची मोठी बाजारपेठ मानली जात होती. कालांतराने ही बाजारपेठ संपुष्टात आली व येथील व्यवसायिक आपल्या व्यवसायाच्या शोधात बाहेर पडले. त्यातील कवितके कुटुंब महिमानगड येथून , पुसेगाव, फलटण, पुणे, तसेच मोठ्या प्रमाणात कोकणात वास्तव्यास गेले. कोकणातील लांजा, दापोली, चिपळूण रत्नागिरी अशा शहरात वास्तव्य केले. आपल्या व्यवसाय शून्यातून उभा करून भरभराटीस नेले. आज या शहरामध्ये कवितके कुटुंबीय यशस्वी मराठी व्यवसायिक म्हणून ओळखले जातात सातारा येथील रूपसमीर, गुरुदेव क्लॉथ स्टोअर्स तसेच कोकणात रत्नागिरी मधील पांडुरंग क्लॉथ स्टोअर , हरीकृष्ण क्लॉथ स्टोअर, सरस्वती क्लॉथ स्टोअर, उदय कलेक्शन, आर. के. टेक्सटाइल, सुविधा कलेक्शन, नागरिक सुटिंग अँड शर्टिंग, वामा लूक सिल्क साडी हे व्यवसाय सुरू आहेत सध्या रत्नागिरी मधील कवितके कुटुंबीयांची सदस्य संख्या 100च्या आसपास आहेकवितके कुटुंबातर्फे दर तीन वर्षांनी असा जागरणचां कार्यक्रम घेण्यात येतो. दरवेळी माण तालुक्यातील महिमानगड येथील मूळ घरी हा कार्यक्रम असतो. मात्र यावेळी रत्नागिरी मधील कवितके कुटुंबाने हा कार्यक्रम रत्नागिरी मध्ये आयोजित केला होता. देवीच्या मंदिरात दिवसभर पूजा पाठ, नंतर गोंधळ, महाप्रसाद, जागरण अश्या क्रमाने हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी सातारा जिल्हा , फलटण तालुक्यातील बरड या गावातील सुनील भिसे यांचा जागरण कार्यक्रम सादर करण्यात आला.या जागरणचे कार्यक्रमात देवी देवतांची गीते सादर करण्यात आली. यावेळी कवितके कुटुंबातील लहान थोर सर्व सदस्यांनी उत्साहाने भाग घेतला . यावेळी जागरण गोंधळ पार्टीचे योगेश धुमाळ,विद्या जावळे ,सुनील भिसे व त्यांचे सहकारी सूरज रोकडे यांनी यावेळी कवितके कुटुंबाप्रती कृतज्ञता व्यक्त केली.www.konkantoday.com