
मराठा आरक्षणासाठीआता वटहुकूम काढला जाऊ शकत नाही, – राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे
मराठा आरक्षणासाठी विधानसभेने कायदा केला असून मुंबई उच्च न्यायालयाने त्याची वैधता प्रमाणित केली आहे, असे असताना आता वटहुकूम काढला जाऊ शकत नाही, असे मत राज्याचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी व्यक्त केले.
सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाज संतप्त झाला आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारकडे वटहुकूम काढण्याचा पर्याय असल्याचे मत मांडले होते. याबाबत कायदेविषयक सल्लागारांनी सहमती दर्शवली तर मराठा समाज रस्त्यावर उतरून आंदोलन करेल, असे वाटत नाही, असेही स्पष्ट केले होते. मात्र, कायदेतज्ज्ञांच्या मते कायदा अस्तित्वात असताना वटहुकूम काढला जाऊ शकत नाही.
www.konkantoday.com