मुंबई दादर येथे आमदार योगेश कदम यांचा कौतुकसोहळा बुरोंडी,ओणनवसे परिसरातील युवावर्गाकडून आयोजन

मुंबई- कोकणातील दापोली विधानसभा मतदारसंघाचे युवा आमदार योगेश कदम यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन मूळच्या दापोली तालुक्यातील बुरोंडी, ओणनवसे भागातील असलेल्या मुंबईस्थित असलेल्या युवकांनी मुंबई दादर येथे केले आहे. शनिवारी दिनांक ०७ डिसेंबर संध्याकाळी ०७ वाजता हा सत्कार सोहळा होणार आहे. शारदाश्रम विद्यामंदिर, दादर पश्चिम येथे या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला आहे. शिवसेना नेते रामदास कदम यांचे सुपुत्र असलेले आमदार योगेश कदम यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघात विरोधकांना पराभवाची धूळ चारत मोठा विजय मिळवला आहे. तरुणाईने आयोजित केलेल्या या सत्कार सोहळ्याला आमदार योगेश कदम यांच्यासमवेत त्यांच्या पत्नी श्रेया कदम याही विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.

आमदार योगेश कदम यांच्या बद्दल ज्येष्ठांपासून ते अगदी युवा वर्ग, महिला वर्ग, शालेय विद्यार्थी यांच्यातही विशेष आपुलकी आहे. त्यांच्या कामाची कार्यपद्धती संवाद साधण्याची सहजता त्यामुळे दापोली खेड मंडळ विधानसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार योगेश कदम हे सगळ्यात युवक असलेले लोकप्रिय आमदार म्हणून ओळखले जातात. प्रशासकीय कर्मचारी अधिकारी यांच्यातही आमदार योगेश कदम यांच्याबद्दल विशेष आदर आहे. यामुळेच पोस्टल मतदानातही आमदार योगेश कदम हे आघाडीवर राहिले होते.विशेष म्हणजे तरुणांनी पुढाकार घेऊन या आगळ्यावेगळ्या आपुलकी व प्रेमाच्या या कौतुक सोहळ्याचा आयोजन केला आहे.

आपण सगळी तरुणाई या निमित्ताने एकत्र येऊ आणि आपल्या ज्या समस्या/अडचणी आहेत त्या दादांसमोर मांडता येतील ह्यासाठी हे प्रयत्न आहेत. आपण एकत्र येऊन आपले आणि आपल्या वाडीचे/गावचे संबंधित अडीअडचणी असो किंवा एखादी रुग्णालयात लागणारी ओळख आहे अनेक प्रश्न युवा वर्गाकडून आमदार योगेश कदम यांच्यासमोर मांडले जाणार आहेत. तसेच सरकारच्या योजना जास्तीत जास्त आपल्याकडे कशा राबवल्या जातील किंवा तरुणांना गावी अथवा मुंबई रोजगाराची संधी कशी उपलब्ध होतील या व अशा अनेक विषयांवर सविस्तर संवाद आमदार योगेश कदम यांच्याजवळ यावेळी या युवा वर्गाकडून साधला जाणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button