*रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी असलेल्या आंबा बोर्डाला**२०० कोटीं रुपयांची आर्थिक तरतुद*

___अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेल्या रत्नागिरी, सिंधुदुर्गसाठी असलेल्या आंबा बोर्डाला शासनाने भरीव तरतूद केली आहे.दोन्ही जिल्ह्यांच्या स्वतंत्र आंबा बोर्डासाठी २०० कोटीं रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. आठ दिवसांत त्याबाबत अध्यादेश काढण्यात येणार असल्याची घोषणा शासनाने केली आहे. यामुळे आंबा उत्पादकांच्या व्यवसायात गोडवा वाढणार आहे. आंबा बागायतदारांसाठी रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी स्वतंत्र आंबा बोर्डाची स्थापना करण्याची प्रक्रिया प्राथमिक टप्प्यात आहे. त्यासाठी २०० कोटींची आर्थिक तरतूद केली आहे. बोर्डाच्या समितीवर शासकीय अधिकाऱ्यांबरोबर अशासकीय सदस्य म्हणून बागायतदारांच्या संघटनेतील दोन सदस्यांना घेण्यात येणार आहे. शेतीमालामध्ये आंबा पिकाचा समावेश व्हावा, यासाठी आयोगाकडे जाऊन मागणी केली आहे. त्यामुळे आंब्याचा लवकरच शेतमालात समावेश होईल. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button