
मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली जनता जनार्दन मच्छिमार नौका बुडाली तीन जणांचा मृत्यू
मालवण तालुक्यातील सर्जेकोट येथून मासेमारीला गेलेली जनता जनार्दन मच्छिमार नौका आचरा समुद्रात दुर्घटना ग्रस्त झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. या दुर्घटनेत तीन मच्छिमारांचा मृत्यू झाला तर एक मच्छिमार पोहत किनारयावर येण्यात यशस्वी ठरल्याने बचावला.मृतात पातीचे मालक सर्जेकोट मच्छिमार संस्थेचे व्हाईसचेअरमन गंगाराम उर्फ जीजी जनार्दन आडकर यांचा समावेश आहे. आडकर हे चौके हायस्कुल मधून शिक्षक म्हणून सेवानिवृत्त झाले होते. तर हडी जठारवाडी येथील लक्ष्मण शिवाजी सुर्वे वय 65 व प्रसाद भरत सुर्वे वय 32 यांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला आहे.ऐन नारळी पौर्णिमेला झालेल्या या दुर्घटनेमुळे सर्जेकोट व हडी गावासह मच्छिमार बांधवांवर शोककळा पसरली आहे. या दुर्घटनेत विजय अनंत धुरत वय 53 रा मोर्वे देवगड हे पोहत किनऱ्यावर पोहचल्याने त्यांचा जीव बचावला असून आचरा प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांच्यावर उपचार केले जात आहेत.