*महाराष्ट्रात तब्बल दोन कोटी वाहने बेवारस*
महाराष्ट्रात तब्बल दोन कोटी वाहने बेवारस असल्याची गंभीर बाब समोर आली. केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार रस्त्यावर धावणा-या प्रत्येक वाहनाला हाय सेक्यूरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक आहे.त्याची अंमलबजावणी सुरू होऊन तब्बल बारा वर्षे होत आली तरी अद्याप जुन्या वाहनांना सदरची नंबर प्लेट लावण्यात आलेली नाहीत्याबाबत परिवहन विभाग उदासीन असल्याचा आरोप नॅशनल रोड सेप्टी कौन्सिलचे सभासद डॉ. कमलजीत साॅय यांनी आज केला. तसेच अशाच हाय सेक्युरिटी नंबर प्लेट नसलेल्या बेवारस वाहनांचा गुन्हेगारीसाठी वापर केला जात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.देशभरात सुमारे ३८ कोटी वाहने आहे. तर देशात एकूण घडणा-या गुन्ह्यांंपैकी ९९ टक्के गुन्ह्यांंमध्ये वाहनांचा वापर केला जातो. तसेच त्यांच्या नंबर प्लेटमध्ये छेडछाड केली जात असल्याने गुन्ह्यांची उकल करताना, गुन्ह्यात वापरलेले वाहन कोणाचे आहे याचा शोध लावणे कठीण होते. त्याची गंभीर दखल घेत केंद्र सरकारने २०१२ मध्ये वाहन कायद्यात बदल करत वाहनांना हाय सेक्युरिटी नंबर प्लेट लावणे बंधनकारक केले आहे.www.konkantoday.com