*भास्कर जाधव यांच्या विरोधात राणे पुन्हा एकदा मैदानात उतरले, सभेपूर्वी चिपळूण, गुहागरमध्ये पोलिसांचा बंदोबस्त*

__माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्याच्या वेळी शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी अनेक सभात नारायण राणे व त्यांच्या कुटुंबीयांवर जोरदार टीका केली होती त्याचा समाचार घेण्यासाठी भाजपचे नेते निलेश राणे यांची शुक्रवारी (ता.१६) गुहागरमध्ये सभा होणार आहे. शिवसेना नेते भास्कर जाधव आणि राणे यांच्यातील वादाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी चिपळूण आणि गुहागरमध्ये मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे भास्कर जाधव आणि नीलेश राणे यांच्यातील वाद सर्वश्रुत आहे. निलेश राणे रत्नागिरी जिल्ह्याच्या दौऱ्यावर आल्यानंतर भास्कर जाधव यांच्या विरोधात टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. लोटे येथे नुकताच राणेंचा दौरा झाला त्यावेळीही त्यांनी भास्कर जाधव यांना लक्ष्य केले होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यात सिंधुदुर्गमध्ये झालेल्या सभांना आमदार जाधव यांनी हजेरी लावली आणि राणे कुटुंबीयांवर टीका केली, त्यानंतर राणे आणि जाधव यांच्यातील वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. भास्कर जाधव यांच्या विरोधात राणे पुन्हा एकदा मैदानात उतरले आहेत. जाधव यांनी सिंधुदुर्गात जाऊन राणेंवर टीका केली, त्याची परतफेड निलेश राणे हे भास्कर जाधव यांच्या गुहागर विधानसभा मतदार संघात जाऊन करणार आहेत. राणेंकडून सभेची जोरदार तयारी सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस अलर्ट झाले आहेत. भास्कर जाधव मंत्री असताना त्यांचे मुंबई-गोवा महामार्गालगत असलेले कार्यालय राणे यांच्या कार्यकत्यांनी फोडले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये मोठी राजकीय चुरस पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर गुहागरमध्ये होणाऱ्या राणेंच्या सभेसाठी चिपळूण आणि गुहागरमध्ये पोलिस बंदोबस्त असणार आहे.शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्याबरोबर दोन पोलिस कर्मचारी असतात. त्याशिवाय त्यांच्या घराकडे पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button