*भागोजी शेठ कीर यांच्या ८० व्या पुण्यतिथी निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या उपक्रमात**रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाचा सक्रिय सहभाग*
____दानशूर श्रीमान भक्ती भूषण भागोजी शेठ कीर यांच्या ८० व्या पुण्यतिथी निमित्त शनिवार दिनांक २४ फेब्रुवारी २०२४ रोजी भंडारी समाजाच्या पुढाकाराने रत्नागिरी येथील श्री पतित पावन मंदिरात रॅली, सहभोजन, सहभजन तसेच समाजातील गुणवंत व्यक्तिमत्त्वांचा सन्मान असा कार्यक्रम भव्य स्वरुपात संपन्न होणार आहे..या कार्यक्रमात रत्नागिरी तालुक्यातील अठरापगड जातीच्या समाज बांधवांना निमंत्रित करण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाच्या वतीने उपक्रमात सक्रिय सहभाग देण्याचे जाहीर केले आहे. सदर कार्यक्रम करिता रत्नागिरी जिल्हा परीट समाज सेवा संघाने आर्थिक हातभार म्हणून दिनांक १० फेब्रुवारी रोजी पतित पावन मंदिरात झालेल्या विविध समाज बांधवांच्या नियोजन बैठकीत रत्नागिरी तालुका भंडारी समाजाचे अध्यक्ष श्री राजीवजी किर त्यांच्याकडे देणगी स्वरुपात चेक सुपूर्द केला. यावेळी परिट समाजाचे कार्यकर्ते सर्वश्री प्रभाकर कासेकर, केदार कोरगावकर, प्रसाद म्हस्के, प्रीतम पावसकर उपस्थित होते. यावेळी उपस्थित प्रतिनिधी सर्वश्री सुधाकरराव सावंत, आप्पा वांदरकर, अण्णा लिमये, सुरेंद्रजी घुडे आदी मान्यवर उपस्थित होते.www.konkantoday.com