*जिल्ह्यातील 10 वी, 12 वी परीक्षा केंद्र परिसरात 21 फेब्रुवारी ते 26 मार्च प्रतिबंधात्मक आदेश*

*रत्नागिरी, दि. 15 :- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.12 वी) ची लेखी परीक्षा 21 फेब्रुवारी ते 19 मार्च 2024 या कालावधीत व माध्यमिक तसेच माहिती तंत्रज्ञान (I.T.) व सामान्य ज्ञान (G.K.) या विषयाची ऑनलाईन परीक्षा 20 मार्च ते 23 मार्च 2024 व माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ.10 वी) ची लेखी परीक्षा 1 मार्च ते 26 मार्च 2024 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारी ते 26 मार्च 2024 या कालावधीत सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत जिल्ह्यातील परीक्षा केंद्राच्या परिसरात कलम 144 लागू करण्यात आला आहे. परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी परीक्षा केंद्राच्या परिसरात 21 फेब्रुवारी ते 26 मार्च 2024 या कालावधीत अपर जिल्हादंडाधिकारी, रत्नागिरी यांनी फौजदारी प्रक्रिया संहिता, 1973 चे कलम 144 प्रमाणे जिल्ह्यातील 10 वी, 12 वी परीक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरात परीक्षेच्या दिवशी सकाळी 9 वाजल्यापासून सायंकाळी 7 वाजेपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश पारीत केला आहे. या आदेशान्वये परीक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तीकडून शांततेस बाधा होईल, असे कृत्य करता येणार नाही. 100 मीटर परिसरातील एस.टी.डी. बुथ, झेरॉक्स सेंटर, टायपिंग सेंटर, ध्वनीक्षेपण इ. माध्यमे आदेशाची मुदत संपेपर्यंत बंद राहतील. परीक्षा केंद्राच्या परिसरात मोबाईल फोन, सेल्यूलर फोन, फॅक्स, ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यास मनाई असेल. कोणत्याही व्यक्तीकडून परीक्षा सुरळीतपणे व शांततेच्या वातावरणामध्ये पार पडण्यासाठी कोणतीही बाधा उत्पन्न करण्यास मनाई असेल. परीक्षा केंद्रांवर कोणत्याही अनधिकृत व्यक्तीस / वाहनास प्रवेशास मनाई राहील. हे आदेश परीक्षा केंद्रांवर काम करणारे अधिकारी/कर्मचारी तसेच परीक्षा केंद्रावर निगराणी करणारे अधिकारी/पोलीस अधिकारी यांचेबाबत त्यांचे परीक्षासंबंधी कर्तव्य पार पाडण्याच्या अनुषंगाने लागू राहणार नाहीत, मात्र त्यांना गैरप्रकार करण्यास प्रतिबंध राहील. या आदेशाची जो अवमान्यता करील तो भारतीय दंड संहिता कलम 188 प्रमाणे शिक्षेस पात्र राहील असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button