*चिपळुणातील उड्डाणपुलाचे काम आराखडा मंजुरीसाठी रखडले*
_मुंबई-गोवा महामार्गावरील बहादूरशेख नाका येथे नव्याने उभारण्यात येणारा उड्डाणपूल कोसळल्यानंतर पुलावरील लाँचर आणि तुटलेले गर्डर हटविण्यात आले.या घटनेनंतर उड्डाणपुलाचा आराखडा बदलून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. नव्या आराखड्यात दोन पिलरच्या मध्ये आणखी एक वाढीव पिलर उभारण्यात येणार आहे. मात्र, नवीन आराखड्याला अद्याप मंजुरी न मिळाल्याने उड्डाणपुलाचे काम रखडले आहे.मुंबई-गोवा महामार्गावरील पेढे-परशुराम ते खेरशेत या ३४ किलोमीटरदरम्यान चौपदरीकरणातील चिपळूण टप्प्यात बहादूरशेख नाका ते प्रांत कार्यालयापर्यंत उड्डाणपूल बांधण्यात येत आहे. हा पूल कोकणातील महामार्गात सर्वाधिक लांबीचा ठरला आहे. बहादूरशेख नाका येथून या पुलाचे काम पावसाळ्यात सुरू करण्यात आले. मात्र, १६ ऑक्टोबर रोजी या पुलाचा काही भाग कोसळला. पूल कोसळल्यानंतर उभारणीतील काही त्रुटी प्राथमिकदृष्ट्या समोर आल्या.त्यानंतर केंद्रातून तज्ज्ञ समिती पाठवून पुलाची तपासणी करण्यात आली. या तपासणीनंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाने या पुलाच्या आराखड्यामध्ये बदल सुचविले होते. www.konkantoday.com