
बनावट ई-पास प्रकरण; राकेश सुर्वेचा मनसेशी काहीही संबंध नाही – मनसे सरचिटणीस तथा खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर.
राकेश सुर्वेचा मनसेशी काहीही संबंध नाही. असे स्पष्टीकरण मनसे सरचिटणीस तथा खेड नगराध्यक्ष वैभव खेडेकर. यांनी केले आहे
बनावट ई पास प्रकरणी गुहागर मनसेचा पदाधिकारी राकेश सुर्वे याला अटक झाल्याची बातमी वाचली आणि अतिशय दुःख झाले. ज्या संघटनेने कोरोनाच्या पाच महिन्याच्या कालावधीमध्ये महाराष्ट्रातील नागरिकांसाठी आवश्यक असलेल्या सगळ्या सुविधा घरपोच देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या कालावधीमध्ये कुठलाच राजकीय पक्ष त्याचे पदाधिकारी आणि त्यांचे नेते रस्त्यावर उतरून काम करत नव्हते. ज्या राजकीय पक्षांना भरभरून मतदान महाराष्ट्रातील जनतेने केले त्यांचे नेते त्यांचे कार्यकर्ते कोरोना कालावधीमध्ये महाराष्ट्रात कुठेही दिसले नाहीत. यांचं सरकार महाराष्ट्रामध्ये हे सर्व स्तरावर अपयशी ठरलेले आहे खास करून कोकणी जनते वरती या सरकारने भरपूर अन्याय केलेला आहे कोकणातील रस्त्यांची बिकट अवस्था शासनाचे अनेक निर्बंध यामुळे कोकणी माणूस फार मेटाकुटीला आलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्या राकेश सुर्वे चा दुरान्वये संबंध गुहागर मनसे’ची नाही. हा गेल्या दोन वर्षापासून कुठलाही संबंध गुहागर मनसे शी नसलेला राकेश सुर्वे तो गुहागर तालुक्यामध्ये राहत नसून मुंबई मध्ये राहतो त्यांनी लावलेला विद्यार्थी सेना संपर्कप्रमुख सचिव हे बोगस पद असून त्याला गुहागर मनसेमध्ये कुठले स्थान नाही त्यामुळे त्याचा आणि मनसे चा कुठलाही संबंध नाही त्यामुळे या प्रकरणाची मनसेचा दुरान्वये संबंध नाही यासंदर्भात सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या कानावर हा संपूर्ण विषय घातलेला आहे येणाऱ्या कालावधीमध्ये राजसाहेब याच्यावरती ठोस निर्णय घेतील आणि कारवाई करतील. असे त्यांनी स्पष्ट केले आहे
www.konkantoday.com




