*राणे विरुद्ध भास्कर जाधव वाद पेटणार*

___भाजप नेते आमदार नीलेश राणेंनी आमदार भास्कर जाधव यांना हिशोब चुकता करण्यास येतोय, असा इशारा दिला आहे.त्यामुळे राणे-जाधव जुना वाद पुन्हा वर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.कोकणात भास्कर जाधव आणि नारायण राणे हा वाद काही वर्षांपूर्वी पेटला होता. कोकणात अलीकडे झालेल्या उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर आता पुन्हा एकदा राणे व ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांच्यामध्ये संघर्षाची ठिणगी पडली आहे. ठाकरे गटाचे नेते आमदार भास्कर जाधव यांनी कोकण दौऱ्यात नारायण राणे यांच्यावर टीका केली होती. त्या ठिकाणी लगेचच नीलेश राणेंनी सिंधुदुर्ग येथे पत्रकार परिषद घेऊन भास्कर जाधवांना सज्जड इशारा दिला होता. त्याचवेळी १६ फेब्रुवारीला, मी गुहागर येथे येत असून, त्या दिवशी होणाऱ्या जाहीर सभेत भास्कर जाधवांबद्दल सगळेच बोलणार, असाही इशारा नीलेश राणेंनी दिला होता. त्या सभेची गुहागर येथे तयारी आता सुरू झाली आहे.ठाकरेंच्या कोकण दौऱ्यात आमदार भास्कर जाधव यांनी नारायण राणे व माजी खासदार नीलेश राणे व आमदार नितेश राणे यांना लक्ष्य केले होते. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button