*रत्नागिरीत जायंट्स ग्रुपचे कार्य विस्तारणार- सीए भूषण मुळ्ये**जायंट्सच्या सहा ग्रुपच्या नूतन कार्यकारिणीचा रत्नागिरीत शपथविधी व पदग्रहण समारंभ*

रत्नागिरी-: जायंट्स ग्रुपतर्फे सामाजिक कार्य सुरू आहे. सध्या रत्नागिरीमध्ये १० ग्रुप असून आगामी काळात यात नक्की वाढ होणार आहे. सामाजिक जबाबदारी म्हणून आपण काम केले पाहिजे, जास्तीत जास्त नवीन सभासद, कार्यकर्ते तयार करूया, असे आवाहन प्रतिपादन जायंट्स फेडरेशनचे (२ ड) नूतन अध्यक्ष सीए. भूषण मुळ्ये यांनी केले.सलग दुसऱ्या वर्षी सीए भूषण मुळ्ये यांच्यावर फेडरेशन २ ड च्या अध्यक्षपदाची जबाबदारी जायंट्स वेल्फेअर फाऊंडेशन वर्ल्ड चेअर पर्सन श्रीमती शायना एन. सी. यांनी सोपवली आहे. जायंटस् ग्रुपच्या नवीन कार्यकारिणीचा पदग्रहण सोहळा व शपथविधी सोहळ्यात ते बोलत होते. प्रसाद हॉटेलच्या सभागृहात कार्यक्रम झाला. या वेळी जायंटस् वेल्फेअर फाऊंडेशनचे विशेष समिती सदस्य डॉ. मिलिंद सावंत आणि संजय पाटणकर, रत्नागिरी उपाध्यक्ष प्रकाश कारखानीस आणि उपाध्यक्ष गजानन गिड्ये यांच्यासमवेत नूतन पदाधिकारी उपस्थित होते.रत्नागिरीच्या अध्यक्षपदी लक्ष्मीकांत भुते, सिटी सहेलीच्या अध्यक्ष दीपाली नार्वेकर, मनकर्णिका सहेलीच्या अध्यक्ष श्रुती दात्ये, कारवांचीवाडी सहेलीच्या अध्यक्ष मधुरा काणे, कुवारबाव सहेलीच्या अध्यक्ष वंदना प्रभू, कारवांचीवाडी ग्रुपचे अध्यक्ष बन्सीधर कुमावत यांनी नूतन अध्यक्ष म्हणून व नूतन कार्यकारिणीने शपथ घेतली. कार्यक्रमात सर्व नूतन अध्यक्षांनी मनोगत व्यक्त करताना जायंट्सच्या माध्यमातून अधिकाधिक समाजसेवा करण्यावर भर असून कायमस्वरूपी उपक्रम राबवण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगिले.या समारंभाला व्यासपीठावर उपस्थित होते. जायंटस फेडरेशन २ ड युनिट संचालक सौ. प्रतिभा प्रभुदेसाई, जायंट्स फेडरेशन २ड युनिट संचालक सौ. पूनम नाळकर यांच्या अधिपत्याखाली शपथविधी कार्यक्रम झाला. मावळते अध्यक्ष श्रीकांत भिडे, सौ. सुनिता तेली, सौ. सुवर्णा चव्हाण, सौ. सुजाता साळवी, हणमंत नाळकर हेसुद्धा या वेळी उपस्थित होते. सौ. अनुया बाम यांनी सूत्रसंचालन केले. कुवारबाव सहेली ग्रुपला त्रिवेंद्रम येथे झालेल्या आंतररष्ट्रीय संमेलनात गौरवण्यात आले. फेडरेशन 2 ड तर्फे उत्कृष्ट कार्याबद्दल कुवारबाव साहेली व रत्नागिरी सिटी सहेली ग्रुपला रोख पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. पीआरओ प्रवीण डोंगरे यांनी आभार मानले.जायंट्सतर्फे सामाजिक चळवळजायंट्स वेल्फेअर फाउंडेशन ही समाजसेवी संघटना आहे. जायंट्सची स्थापना १७ सप्टेंबर १९७२ रोजी मुंबईत माजी नगरपाल नाना चुडसामा यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. आज ही चळवळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. १७ ते २३ सप्टेंबर या काळात जायंट्स सेवा सप्ताहात विविध कार्यक्रम व त्या महिन्यात नावीन्यपूर्ण उपक्रम केले जातात. जायंट्सचे भारतात ५०० हून अधिक ग्रुप कार्यरत आहेत. तसेच मॉरिशस, ब्रिटन, आफ्रिका, केनिया, नेपाळ, नॉर्वे, तैवान, अमेरिका, नैरोबी या देशातही जायंट्स ग्रुप सक्रिय आहे, अशी माहिती या वेळी प्रास्ताविक करताना अनुया बाम यांनी दिली.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button