*मुंबई गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार*
____मुंबई गोवा महामार्गावरील वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना आज बुधवार 14 फेब्रुवारी सायंकाळी 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. कंटेनरखाली सापडलेला दुचाकीस्वार वरवडे येथील असल्याचे समजते. किरण विचारे असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो आंबेड बुद्रुक येथील पोस्टाचा कर्मचारी असल्याचे समजते. आपले काम आटोपून तो रत्नागिरीच्या दिशेने जात होता.गोव्याहून मुंबईच्या दिशेने कंटेनर चालक कंटेनर घेऊन चालला होता. यावेळी वांद्री सप्तलिंगी येथे कंटेनर चालक एका गाडीला ओव्हरटेक करत असताना. समोरून दुचाकी (08 बीए 8504) ने येणाऱ्या किरण विचारे याला जोरदार धडक दिली. यामध्ये किरण विचारे हा दुचाकीसह कंटेनरच्या पुढील चाकाखाली सापडला. यातच त्याचा मृत्यू झाला. www.konkantoday.com