*महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेतर्फे विभागिय कार्यशाळेसमोर पदाधिकारी बेमुदत उपाेषणाला*
____एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटनेतर्फे मंगळवारी ( दि. १३) विभागिय कार्यशाळेसमोर पदाधिकारी बेमुदत उपाेषणाला बसले आहेत.एसटी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता, घरभाडे भत्त्याची व वार्षिक वेतनवाढीची वाढीव दराची थकबाकी देण्याबाबत १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त कामगार संघटनेसमवेत बैठक घेऊन निर्णय घेण्याचे मान्य केले होते; परंतु ४ महिन्यांचा कालावधी संपूनही अद्याप बैठक झालेली नाही; तसेच सन २०१६ ते २०२० च्या कामगार करारासाठी शासन/प्रशासनाने एकतर्फी जाहीर केलेल्या ४ हजार ८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप, पाच हजार, चार हजार, २,५०० मूळ वेतनात दिलेल्या वाढीमुळे सेवाज्येष्ठ कर्मचाऱ्यांच्या वेतनातील विसंगती दूर करून सरकसकट पाच हजार रुपये देण्यात यावे, या मागण्यांवर संघटना ठाम आहे.www.konkantoday.com