बारावी परीक्षेसाठी पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावीची परीक्षा फेब्रुवारी 21 पासून सुरु होत आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र राज्य मंडळाकडून 22 जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलं आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (राज्य मंडळ) बारावीची परीक्षा फेब्रुवारी 21 पासून सुरु होत आहे. या परीक्षेसाठीचे प्रवेशपत्र राज्य मंडळाकडून 22 जानेवारीपासून ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आलं आहे.आता या परीक्षेसंदर्भात बोर्डाने सूचना जारी केल्या आहेत. पेपर सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक असणार आहे. पेपर सुरू झाल्यानंतर आलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसू दिले जाणार नाही, अशा सूचना बोर्डाकडून प्रत्येक केंद्रांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रांवर जावे.
बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी बोर्डातर्फे यंदा सरमिसळ पद्धत वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे एकच शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थी बारावीच्या परीक्षेवेळी एकामागे एक बसणार नाहीत. वेगवेगळ्या परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांचे क्रमांक असणार आहेत. याआधी विद्यार्थ्यांना पेपर सुरू होण्याच्या दहा मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जायची. पण आता ही पद्धत बंद करून विद्यार्थ्यांना पेपरच्या शेवटी दहा मिनिटांचा वाढीव वेळ दिला जाणार आहे.
www.konkantoday.com