
*जाकिमिर्या, सडामिर्या दरम्यान समुद्र किनार्यालगत प्रचंड मोठा व्हेल मासा मृतावस्थेत सापडला*
_जाकिमिर्या, सडामिर्या दरम्यान समुद्र किनार्यालगत प्रचंड मोठा व्हेल मासा मृतावस्थेत किनार्याला लागला. मृतावस्थेत सापडलेल्या या व्हेल माशाची माहिती वन विभागाला देण्यात आली. तब्बल ४५ फूट लांबीचा हा व्हेल मासा होता. दोन दिवसांपूर्वी हा व्हेल मासा समुद्रकिनारी लागला असावा अशी शक्यता वर्तवण्यात आली. वन विभागाच्या अधिकाऱ्यांना याबाबतची माहिती मिळताच वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले.www.konkantoday.com