*चिंचखरी आणि पूर्णगड परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन मुलींचा शोध घेण्यात ग्रामीण पोलिसांना यश*_
_रत्नागिरी तालुक्यातील चिंचखरी आणि पूर्णगड परिसरातून बेपत्ता झालेल्या दोन मुलींचा शोध घेण्यात ग्रामीण पोलिसांना यश आले आहे. या दोन्ही मुलींना तळोजा (नवी मुंबई) येथून पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.श्रेया (18) आणि सोनिया (20) अशी मिळून आलेल्या दोन्ही मुलींची नावे आहेत.या दोन्ही मुली शुक्रवार 2 फेब्रुवारी रोजी सकाळी घरातून कॉलेजला जाण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. सायंकाळी उशिरापर्यंत त्या घरी न परतल्याने त्यांच्या पालकांनी संबंधित पोलिस ठाण्यात त्यांच्या बेपत्ता होण्याची खबर दिली होती.या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी तपास करुन दोन्ही मुलींना तळोजा येथून ताब्यात घेतले. या दोन्ही मुली अज्ञात कारणातून एकत्रितपणे घरातून पळून गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.www.konkantoday.com