*पर्यटकांनो तुम्ही विशाळगड रोडवर रात्री फिरणार असाल तर ते आता शक्य नाही, आंबा ते विशाळगड सूर्यास्तानंतर वाहतूक बंद*

__विशाळगड : वन्यप्राण्यांच्या संरक्षणासाठी आंबा विशाळगड मानोली, विशाळगड, गजापूर, केंबुर्णेवाडी, आंबा या गावांसाठी मार्ग खुला राहील, अशी माहिती मलकापूर वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी दिली.आंबा-विशाळगड हा मार्ग सह्याद्रीच्या घनदाट जंगलातून जातो. राधानगरी आणि चांदोली अभयारण्यांना जोडणारा हा घनदाट वनराजीचा भाग आहे. विविध पक्षी, प्राणी, वनौषधी यांनी संपन्न जंगल असल्याने या मार्गावर जंगली पशू-पक्ष्यांचा वावर असतो. दुर्मीळ अशा जैविक जातीही येथे आढळतात. राज्य प्राणी शेखरू, गवा, लांडगा, कोल्हा, मोर, रानकोंबडे, मलबार पायबर पीठ, हॉर्नबिल यासारखे दुर्मीळ पक्षी-प्राण्यांच्या जाती येथे पाहावयास मिळतात. यांची सुरक्षितता तसेच निसर्ग सांभाळणारा प्रमुख घटक म्हणून त्यांचे जतन व संवर्धन करण्यासाठी हा मार्ग रात्रीचा बंद ठेवणे गरजेचे आहे. मानोली येथील चेक पोस्ट येथे वन विभागाच्या वतीने प्रवाशांची तपासणी केली जाते. रात्रीची वाहतूक बंद केल्याने वनौषधींची तस्करी, चोरटी वृक्षतोड व गुन्हेगारीलाही पायबंद बसणार आहे.वन्यजीव संरक्षणाच्या दृष्टीने संयुक्त वन व्यवस्थापन समिती मानोली, मानोली ग्राम व वन विभाग करत असलेली उपाययोजना म्हणून रस्ता रात्रीच्या वेळी बंद राहील, असे वनपरिक्षेत्र अधिकारी अमित भोसले यांनी सांगितले. www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button