वांझोळे-मोर्डे-कनकाडी-रस्ता दुरुस्तीबाबत गाव विकास समितीच्या आंदोलनाची प्रशासनाने घेतली दखल, उपअभियंता गायकवाड यांनी आंदोलकांची घेतली प्रत्यक्ष भेट*

*दुरावस्था झालेल्या रस्त्याची दुरुस्ती करण्याचे प्रशासनाचे आश्वासनवांझोळे:- वांझोळे मोर्डे कणकाडी दाभोळे रस्त्याच्या दुरावस्थेविरोधात गाव विकास समितीचे नितीन गोताड यांच्या माध्यमातून वांझोळे फाटा येथे आंदोलन पार पडले.संबंधित विभागाचे अधिकारी यांनी आंदोलन स्थळी प्रत्यक्ष भेट देऊन खराब रस्त्याचा हा प्रश्न सोडविण्यात येईल असे आश्वासन ग्रामस्थांना दिले.या आंदोलनाला गाव विकास समितीचे अध्यक्ष उदय गोताड व संघटन प्रमुख सुहास खंडागळे उपाध्यक्ष मंगेश धावडे,सुनिल खंडागळे यांची प्रमुख उपस्थिती होती.सदर आंदोलनाला जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता गायकवाड साहेब यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आंदोलनकर्त्यांची मागणी समजून घेतली व सदर रस्ता दुरुस्त करण्यासंदर्भात लेखी आश्वासन दिले.रस्त्याची बिकट स्थिती लक्षात घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरू केल्याचे लेखी पत्र प्रशासनाने नितीन गोताड यांना दिले.सदर आंदोलन शांततेच्या मार्गाने पार पडले. देवरुख पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यादवसाहेब यांनी देखील आंदोलनाला प्रत्यक्ष भेट दिली.या आंदोलनाला देवरुख पोलिसांनी सहकार्य केल्याबद्दल ग्रामस्थांनी पोलीस प्रशासन व जिल्हा परिषद प्रशासनाचे आभार मानले.यावेळी गाव विकास समितीचे सरचिटणीस डॉ. मंगेश कांगणे,जिल्हा उपाध्यक्ष मुझमील काझी, जिल्हा संघटक मनोज घुग, संगमेश्वर तालुका उपाध्यक्ष दैवत पवार,गावातील ग्रामस्थ दिनेश गोताड, महेश धावडे, मनोहर पाष्टे, गजानन गोताड, संतोष गोताड, संजय गोताड, राजाराम तांदळे, मनोहर धावडे, मंगेश पाष्टे, अनिल धूमक, अनंत मोसमकर, दीपक ढवळ महादेव गोताड इत्यादी उपस्थित होते तसेच वांझोळे रिक्षा संघटना चे सदस्य संतोष गोताड, दिनेश चव्हाण, महादेव गोताड,दीपक सनगले व मोर्डे ग्रामस्थ संजय आटले यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन समर्थन दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button