*भारताच्या अखंडतेसाठी आर्थिक निकषावर आरक्षण हवे*
रत्नागिरी:- ज्याची आर्थिक परिस्थिती नाही त्याला आरक्षण मिळाले पाहिजे. मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो तोवर आरक्षणाचा विषय संपणार नाही. आरक्षण विषयावरून समाजा-समाजात दुफळी निर्माण होत असताना भारताच्या अखंडतेसाठी आर्थिक निकषावर आरक्षण हवे आहे. कधी ना कधी हा निर्णय संसदेला घ्यावा लागणार आहे, असे मत आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजेभोसले यांनी केले.राजेशिर्के प्रतिष्ठान पुणे, यांच्यावतीने राजेशिर्के परिवार व आप्तेष्टांच्या स्नेहमेळाव्याचे आयोजन रविवारी भागिरथीबाई राजेशिर्के सभागृहात करण्यात आले होते. यावेळी ते कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेशिर्के यांनी केले. या दरम्यान स्मरणिकेचे प्रकाशन तसेच विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.www.konkantoday.com