
*जेईई मेन्सचा निकाल जाहीर; महाराष्ट्रातील 3 विद्यार्थ्यांनी पटकवले १०० टक्के गुण*
____अनेक दिवसांपासून विद्यार्थी जेईई मेन्सच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत होते. या परीक्षेचा निकाल अखेर आज जाहीर झाला आहे. यंदा महाराष्ट्रातील ३ विद्यार्थ्यांनी या परीक्षेत १०० टक्के गुण मिळवले आहेत.आर्यन प्रकाश, निलकृष्ण गजरे, दक्षेश मिश्रा अशी या तिन्ही विद्यार्थ्यांची नावे आहेत.संपूर्ण देशभरामध्ये एकूण २३ विद्यार्थ्यांनी १०० टक्के गुणांवर यश संपादन केलं आहे. देशभरातून या परीक्षेला ११ लाख ७० हजार विद्यार्थ्यां बसले होते. यामध्ये ३ लाख ८१ हजार मुली आहेत. जेईई परीक्षेत दीड लाख विद्यार्थी पात्र ठरतात. या सर्वांना पुढे जेईई ऍडव्हान्स ही परीक्षा द्यावी लागते.www.konkantoday.com