*संगमेश्वर रेल्वे स्थानकात आरक्षण केंद्राचे उत्साहात उद्घाटन*
___निसर्गरम्य चिपळूण व संगमेश्वर फेसबुक ग्रुपचे प्रमुख श्री संदेश जिमन व सहकाऱ्यांच्या सततच्या प्रयत्नाना यश येऊन संगमेश्वर रोड रेल्वे स्थानकावर आरक्षण खिडकीचा शुभारंभ आज (सोमवार) RRM श्री रविद्र कांबळे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. संगमेश्वरवासींय जनतेची करोना काळापासून असलेली ही मागणी आज ढोल ताशाच्या गजरात अतिशय आनंददायी वातावरणात प्रत्यक्षात आली.कोकण रेल्वे रिजनल मॅनेजर रत्नागिरी श्री रविद्रं कांबळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले व आरक्षण प्रणालीचे उद्घाटन झालेप्रमुख पाहूणे म्हणून श्री सहदेव बेटकर; रेल्वेचे इतर अधिकारी; संगमेश्वर व देवरूख येथील व्यापारी वर्ग; इतर मान्यवर पत्रकार संगमेश्वर पोलीस ठाण्याचे अधिकारी आम्हाला कोकण रेल्वे विषयक कामात सतत मदत व मार्गदर्शन करणारे जल फाऊंडेशन अध्यक्ष श्री अक्षय महापदी; श्री नितीन सखाराम जाधव; श्री पाटणे, श्री. राजू कांबळे हे सर्व सहकारी उपस्थित होते.सदर कार्यक्रमात संगमेश्वर तालुक्यातील प्रवाशानी मोठी गर्दी केली होती. निसर्गरम्य चिपळूण संगमेश्वर फेसबूक ग्रुपचे प्रमुख श्री संदेश जिमन यांनी उपस्थित मान्यवरांचे व जनतेचे आभार मानले आणि कृतज्ञता व्यक्त केली. यापुढील रेल्वे विषयक कामात आजपर्यंत केलेल्या सहकार्याप्रमाणेच या पुढे देखील सहकार्य द्याल अशी अपेक्षा व्यक्त केली व कार्यक्रमाची सांगता झाली.या कार्यक्रमाला सहदेव बेटकर राजेंद्र घोलप (उप मुख्य वाणिज्य प्रबंधक) कोकण रेल्वे चे दिलीप भट ,ग्रुप चे प्रमुख पत्रकार संदेश जिमन आणि संगमेश्वर व्यापारी संघ चे बापू भिंगार्डे; रिंकू कोळवणकर कमलाकर ब्रीद वहाब दळवी शांताराम टोपरे आणि कोकण रेल्वे चे कर्मचारी आणि असंख्य प्रवाशी वर्ग रिक्षा संघटना उपस्थित होतेआज उद्घाटनानंतर पहिलं तिकीट श्री बेटकर यानी काढले आणि दुसरे तिकीट संदेश जिमन काढलेwww.konkantoday.com