
*मंडणगड किल्ल्याच्या पर्यटन विकासाकरिता १ कोटी ९० लाखांचा निधी मंजूर*_____
मंडणगड:– किल्ले मंडणगडच्या पर्यटन विकासाकरिता रायगड-रत्नागिरी लोकसभा क्षेत्राच खासदार सुनिल तटकरे यांच्या प्रयत्नामुळे १ कोटी १० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. श्रीवर्धन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत खासदार सुनिल तटकरे यांनी ही माहिती दिली.मंडणगड येथील नवयुवक तरूण मंडळाच्या वतीने किल्ल्यांच्या पर्यटन विकासाकरिता निधीची मागणी नगरपंचायत मंडणगड यांच्याकडे करण्यात आली होती. त्यानुसार बांधकाम सभापती सौ. प्रियांका लेंडे व माजी बांधकाम सभापती दिनेश लेंडे यांनी खासदार सुनिल तटकरे यांच्याकडे किल्ल्याच्या पर्यटन विकासाकरिता सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे खासदार तटकरे यांच्या प्रयत्नांमुळे पहिल्या टप्प्यात १ कोटी ५० लाख निधी नगर पंचायतीस प्राप्त झाला आहे. www.konkantoday.com