बस स्टॅन्डवर गर्दीचा फायदा घेवून दागिने चोरणारी सराईत महिलाआरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जेरबंद


बस स्टॅन्डवर गर्दीचा फायदा घेवून दागिने चोरणारी सराईत महीलाआरोपी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून जेरबंद करण्यात आली आहे
दिनांक 05/02/2024 रोजी रत्नागिरी बसस्टॅन्ड येथे बसमध्ये चढत असताना गर्दीचा
फायदा घेवून अज्ञात चोरटयाने पर्समधील दागिने व रोख रक्कम चोरल्यावरुन रत्नागिरी शहरपोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. 49/2024, भा.दं.वि.क. 379 हा गुन्हा दाखल करण्यात आला.मा.पोलीस अधीक्षक श्री.धनंजय कुलकर्णी, मा.अपर पोलीस अधीक्षक. श्रीमती जयश्री गायकवाड यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक, श्री.जनार्दन
परबकर यांनी तात्काळ एक पथक तयार करुन सदर पथकाला गुन्हा उघडकीस आणण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या सुचना दिल्या.
सदर पथकाकडून अज्ञात आरोपीत यांचा शोध सुरु असताना नमुद गुन्हा हा रेकॉर्डवरीलमहीला आरोपी अनघा अनंत जोशी हीने केलेला असलेबाबतची गोपनीय माहीती प्राप्त झाली. त्याआधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्य पथकाने महीला आरोपी अनघा अनंत जोशी, वय 63 वर्षे,
रा. ए/351 बसेरा, शिवाजीनगर, रत्नागिरी सध्या रा. जंगली महाराज रोड, शिवाजीनगर पुणे
हीला दिनांक 10/02/2024 रोजी ताब्यात घेण्यात आलेले आहे. आरोपीत हिचे ताब्यातून गुन्हयातचोरीस गेलेला एकूण 45,350 रुपये किमंतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. अनघा
अनंत जोशी ही रेकॉर्डवरील स
हाईत महीला आरोपी असून तिचेवर रत्नागिरी, सांगली, कोल्हापूर,पनवेल या जिल्हयामध्ये एकूण 12 गुन्हे दाखल आहेत. तिचेकडून अजून गुन्हे उघडकीस येण्याची
शक्यता आहे त्यादृष्टीने स्थानिक गुन्हे अन्वष्े ाण शाखेकडून तपास सुरु आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील खालील नमुद पोलीस अधिकारी /
अंमलदार यांनी केलेली आहे.
पोउनि/ श्री.आकाश साळुंखे,
पोहेकॉ/ 909 विजय आंबेकर
मपोहेकॉ/1147 वैष्णवी यादव
पोकॉ/215 अतुल कांबळे
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button