
*दापोलीच्या पार्यात पुन्हा घसरण*______
दापोली– दापोलीत मागील काही दिवसात तापमानामध्ये वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले होते. शिवाय बागायतदारही चिंतेत होते. परंतु पुन्हा दापोलीच्या पार्यात घसरण झाली आहे. यामुळे दापोलीकरांसह बागायतदार सुखावला आहे. दापोलीच्या तापमानात ९.५ अंश सेल्सिअस इतकी नोंद डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने केली आहे.गेले काही दिवस दापोलीचे किमान तापमान १४.२ अंश सेल्सिअसच्या वर गेले होते. परंतु दापोलीच्या पार्यात पुन्हा घसरण होवून ९.९ त्यानंतर ९.५ अंश सेल्सिअस इतके तापमान खाली आले आहे. या आधी दापोलीचा पारा ९.४ अंश सेल्सिअस इतका खाली आल्याची नोंदही झाली आहे. www.konkantoday.com